वृत्तसंस्था/ हॅमबुर्ग (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या हॅमबुर्ग युरोपियन खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवने सर्बियाच्या डिजेरीचा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हेरेवने डिजेरीचा 7-5, 6-3 असा फडशा पाडत अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेत तब्बल 30 वर्षांनंतर जर्मनीच्या खेळाडूला पहिल्यांदाच विजेतेपद मिळविता आले. 2021 पासून व्हेरेवला एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती. व्हेरेव आणि डिजेरी यांच्यातील हा अंतिम सामना 110 मिनिटे चालला होता. एटीपी टूरवरील व्हेरेवचे हे 20 वे विजेतेपद आहे.









