वृत्तसंस्था / लंडन
डब्ल्युटीए टूरवरील येथे झालेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट महिलांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या 37 वर्षीय ताताना मारियाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना आठव्या मानांकित अॅनिसिमोव्हाचा पराभव केला. आगामी विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
दोन मुलांची आई ताताना मारियाने डब्ल्यूटीए टूरवरील ही पहिलीच स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात तीने आठव्या मानांकित अमंदा अॅनिसिमोव्हाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 2020 साली अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने आपल्या वयाच्या 38 व्या वर्षी ऑकलंड क्लासीक टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर डब्ल्युटीए टूरवरील स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविणारी मारिया ही दुसरी अधिक वयस्कर महिला टेनिसपटू ठरली आहे.









