फ्रान्सचा पराभव, अर्जेन्टिना पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
दोन वेळचे वर्ल्ड चॅम्पियन्स जर्मनीने येथे झालेल्या क्रॉसओव्हर लढतीत फ्रान्सचा 5-1 असा धुव्वा उडवित विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात कोरियाने अर्जेन्टिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव करून आगेकूच केली. जर्मनीची उपांत्यपूर्व लढत इंग्लंडशी तर कोरियाची लढत नेदरलँड्सशी होणार आहे.
जर्मनीने फ्रान्सवर चारही सत्रात वर्चस्व गाजविले. जर्मनीचे गोल मार्को मिल्टकाव (15 वे मिनिट), निकलास वेलेन, मॅट्स ग्राम्बुश (23 वे मिनिट), मॉरिट्झ ट्रॉम्पेर्ट्झ (24 वे मिनिट), गोन्झालो पीलट (59 वे मिनिट, पीसी) यांनी नोंदवले तर फ्रान्सचा एकमेव गोल 57 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर फ्रान्कोइस गोयेतने नोंदवला.
अन्य एका सामन्यात अर्जेन्टिना व कोरिया यांच्यात निर्धारित वेळेत 5-5 अशी बरोबरी झाली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये कोरियाने अज्sा&न्टिनावर 3-2 अशी मात करीत आगेकूच केली. फ्रान्स व अर्जेन्टिना यांना आता क्लासिफिकेशन लढतीत खेळावे लागणार आहे. क्लासिफिकेशन सामने 26 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
आजचे उपांत्यपूर्व सामने
1) ऑस्ट्रेलिया वि. स्पेन
वेळ ः सायं. 4.30 वाजता
2) न्यूझीलंड वि. बेल्जियम
वेळ ः सायं. 7 वाजता
स्थळ ः भुवनेश्वर.









