वृत्तसंस्था/ वुल्फसबर्ग (जर्मनी)
येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या मैत्रिपूर्ण फुटबॉल सामन्यात बलाढ्या जर्मनीला जपानकडून 4-1 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला. युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेला आता केवळ नऊ महिने बाकी राहिले असून जपानचा जर्मनीवर मिळविलेला विजय निश्चितच कौतुकास्पद आहे.
या सामन्यात जपानने मध्यतंरावेळी जर्मनीवर 2-1 अशी आघाडी घेतली होती. जपान संघाला प्रशिक्षक फ्लिक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत जपानने प्राथमिक गटातील सामन्यात जर्मनीचा पराभव केला आहे.









