प्रतिनिधी,इचलकरंजी
महिन्याभरापासून पसार असलेल्या इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी गँगच्या नामचिन गुंडाच्या कर्नाटक राज्यातील खानापूर भागात मुसक्या आवळण्यास बुधवारी रात्री उशिरा शहापूर पोलिसांना यश आले. आंनद्या उर्फ आंनदा जर्मनी असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधी मोक्याचे तब्बल पाच गुन्हे नोंद आहे.
गुंड जर्मनी आणि त्याचे काही साथिदार काही महिन्यापूर्वी जामिनावर कारागृहातून बाहेर आले आहेत. बाहेर येताच त्याने साथिदारांच्या मदतीने 5 ऑगस्ट रोजी रात्री खंडणीसाठी शहरालगतच्या शहापूर, गैबान रेसिडेन्सीमध्ये राहणारा खासगी सावकार आणि रिअल इस्टेट व्यावसायिक सरदार मुजावर यांचे अपहरण केले.त्याला चारचाकी गाडीतून फिरवत, गाडीतच बेदम मारहाण करीत, त्यांच्याकडील 18 तोळे सोन्याचे दागिणे आणि चार लाखांची रोकड असा 11 लाख 35 हजार ऊपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेवून पलायन केले होते. या घडल्या घटनेपासून पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाकडून त्याचा शोध घेतला जात होता. पण तो मिळून येत नव्हता.
याचदरम्यान तीन दिवसापूर्वी गुंड जर्मनी पोलिसांना चकवा देत दुचाकीवऊन इचलकरंजीत आला. येथील जवाहरनगरातील राहत्या घरी येवून पत्नीला दुचाकीवऊन घेवून गेला होता. या त्याच्या कारनाम्या विषयी ‘मोक्या’ तील पसार गुंडाने साधला ‘मोका’ या मथळ्याखाली ‘तरूण भारत संवाद’ ने 6 सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. तसेच या वृत्तानंतर पोलिसांनी त्याचा कसून शोध सुऊ केला होता. याचदरम्यान बुधवारी दुपारी गुंड जर्मनी हा कर्नाटक राज्यातील खानापूर परिसरात असल्याची माहिती बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. त्यावऊन शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे एक पथक त्वरीत खानापूरकडे रवाना झाले. या पोलीस पथकाच्या हाती तो रात्री उशिरा लागला, अशी माहिती पोलीस सुत्राकडून देण्यात आली.
गुंड जर्मनी आणि त्याचे काही साथिदार काही महिन्यापूर्वी मोक्याच्या गुह्यातून कारागृहातून जामिनावर बाहेर आले आहते. तर त्याचा लहान भाऊ, नामचिन गुंड आद्या उर्फ आदर्श जर्मना हा मोक्याबरोबर खून, खूनाचा प्रयत्न अशा गंभीर गुह्यात कारागृहाची हवा खात आहे. त्याला कारागृहातून जामिनावर बाहेर काढण्यासाठी लागणाऱ्या पैश्यांसाठी गुंड आंनद्या उर्फ आंनदा जर्मनी आणि त्याच्या साथिदारांनी लुटमार आणि खंडणीसाठी शहरातील उद्योजक, व्यावसायिकांचे अपहरण करण्याचा प्लॅन केला होता.
याविषयी गुंड आंनद्या उर्फ आंनदा जर्मनी आणि त्याच्या साथिदाराविरोधी अपहरण, लुटमार, मारामारी प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याची गांभीर्याने दखल घेत शहापूर आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कुख्यात जर्मनी गँगचा म्होरक्या आणि नामचिन गुंड आंनद्या उर्फ आंनदा जर्मनीसह त्याच्या साथिदारांचा कसून शोध सुऊ केला. पोलिसांना या गुह्यात या गँगच्या डझनभर गुन्हेगारांना अटक करण्यास यश आले. पण गुंड आंनद्या उर्फ आंनदा जर्मनी शोध घेवून ही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर महिन्याभराच्या कालावधीनंतर शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.









