जॉर्ज क्लुनी आणि ब्रॅड पिट हे हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. आता 16 वर्षांनी दोघेही एकत्र दिसून येणार आहेत. जॉर्ज क्लुनी आणि ब्रॅड यावेळी जॅन वॉट्स यांच्या अॅक्शन कॉमेडी ‘वुल्फ्स’मध्ये एकत्र झळकतील. निर्मात्यांनी याचा ट्रेलर जारी केला आहे.
‘लोन वुल्फ’विषयी आपण सर्वांनी कहाण्या ऐकल्या आहेत. वुल्फ्स या चित्रपटात क्लुनी आणि पिट हे दोघेही लोन वुल्फ असतील. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक महिला एका फिक्सला हत्येनंतर मदतीसाठी बोलावत असल्याचे आणि याचदरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी एक फिक्सर तेथे पोहोचत असल्याचे दिसून येते. यानंतर चित्रपटाच्या कहाणीला अनेक वळणं मिळत असल्याचे दिसून येणार आहे.
या चित्रपटात जॉर्ज क्लुनी आणि ब्रॅड पिटसोबत ऑस्टिन अब्राम्स, एमी रयान आणि पूर्णा जगन्नाथन हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन वॉट्स यांनी केले आहे. ब्रॅड पिट आणि जॉर्ज क्लुनी यांनी ‘ओशन्स 11’, ‘ओशन्स 12’ आणि ‘ओशन्स 13’मध्ये एकत्र काम केले होते. तर 2008 मध्ये ते ‘आफ्टर रीडिंग’ या चित्रपटात दिसून आले होते. आता 16 वर्षांनी ते वुल्फ्स या चित्रपटात दिसून येणार आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









