नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ हिने चालू वर्षातील एप्रिल महिन्यात तब्बल 16.8 लाख नवे मोबाईल ग्राहक जोडले असून दुसऱया बाजूला एअरटेल ग्राहकांच्या संख्येत याच दरम्यान 8.1 लाख इतकी वाढ झाली आहे. तर व्होडाफोन-आयडिया यांनी एप्रिल 2022 दरम्यान 15.7 लाख इतके ग्राहक गमावले आहेत, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांनी दिलेल्या मासिक अहवालात दिली आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार 16.8 लाख नवीन ग्राहकांसोबत जिओच्या मोबाईल ग्राहकांची संख्या ही 40.5 कोटीच्या घरात पोहोचली आहे. भारती एअरटेलने 8.1 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. यासोबतच कंपनीच्या सेवांचा वापर करण्यासाठी ग्राहकांची एकूण संख्या ही 36.11 कोटीच्या घरात पोहोचली आहे. दुसऱया बाजूला एप्रिलच्या दरम्यान 15.68 लाख इतक्या ग्राहकांनी व्होडाफोन-आयडिला सोडले आहे.









