वृत्तसंस्था /मुंबई
जेनसोल इंजिनियरिंग ही ऊर्जा आणि इलेक्ट्रीक मोबिलीटी क्षेत्रातील कंपनी गुजरातमध्ये 2 हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. सदरच्या गुंतवणुकीचा वापर कंपनी इलेक्ट्रीक वाहन निर्मिती कारखान्यासाठी केला जाणार आहे. वायब्रंट गुजरात जागतिक शिखर संमेलनामध्ये अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीची योजना बनवली आहे. या अंतर्गत जेनसोल इंजिनियर्सने देखील 2000 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भात कंपनीने गुजरात सरकारसोबत सहकार्याचा करार केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत उभयतांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर सुमारे 1500 जणांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. जेनसोल समूहाचे सहसंस्थापक अनमोल सिंग जग्गी यांनी याबद्दल गुजरात सरकारचे आभार मानले आहेत.









