वृत्तसंस्था / जिनोआ (इटली)
येथे सुरू असलेल्या सिरी ए फुटबॉल स्पर्धेत जिनोआने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. अॅलेसेंड्रो झेनोलीच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर जिनोआने युडेनेसीचा 1-0 असा निसटता पराभव केला.
या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल झेनोलीने 77 व्या मिनिटाला नोंदविला. युडेनीसीला शेवटपर्यंत तिचे खाते उघडता आले नाही. घरच्या मैदानावरील सामन्यात जिनोआने आपली विजयी घोडदौड गेल्या सहा सामन्यात कायम राखली आहे. या विजयामुळे जिनोआ स्पर्धेच्या गुणतक्त्यात बाराव्या स्थानावर आहे.









