24 वी व्हीटीयू अॅथलेटिक्स स्पर्धा : जीवन एन.एम, पवित्रा जी. वैयक्तिक विजेते : रंगनाथनचा स्पर्धेतील नवा विक्रम : अभिरंजन एच, ध्रुती एस. स्पर्धेतील जलद धावपटू

बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक महाविद्यालय आयोजित 24 वी व्हीटीयू तांत्रिक आंतर महाविद्यालयीन अॅथेलिटक्स स्पर्धेत पुरूष व महिला विभागात विवेकानंद महाविद्यालय पुतूर संघाने 136 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महिला विभागात विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय पुतूरने 86 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद सह्याद्री तांत्रिक महाविद्यालये मंगळूरने 23 गुणासह पहिले उपविजेतेपद तर एसडीएम धारवाड महाविद्यालयाने 15 गुणासह दुसरे उपविजेतेपद पटकाविले. पुरूष गटात विवेकानंद पुट्टूर संघाने 50 गुणासह विजेतेपद एनएमएएन तांत्रिक महाविद्यालय नेट्टेने 49 गुणांसह पहिले उपविजेतेपद तर श्रीनिवास तांत्रिक महाविद्यालय बंगळूरने 12 गुणासह दुसरे उपविजेतेपद पटकाविले. पुरूष गटात जीवन एनएमने 1596 गुणासह तर महिला गटात पवित्रा जी हिने 1797 गुणासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. शेवटच्या दिवशी दोन नवीन स्पर्धा विक्रम नोंदविण्यात आले. अभिरंजन एच. व धारूती एस. यानी जलद धावपटूचा बहुमान मिळविला. व्हीटीयू मैदानावर आयोजित केलेल्या अॅथेलिटक्स स्पर्धेत सकाळी घेण्यात आलेल्या 21 कि. मी. हॉफ मॅरेथॉन स्पर्धेत नवीन विक्रम नोंदविण्यात आला. हा विक्रम सरकारी तांत्रिक महाविद्यालय रामनगरच्या रंगनाथ सी याने 1 तास 11 मिनिटे 16.53 यावेळेत पूर्ण करून पूर्वी असलेला सुजन शेखरचा 1 तास 16 मिनिटे 1 सेंकद हा विक्रम मोडित काढीत स्पर्धेच नवीन विक्रम नोंदविला. तर फुलवॉटमध्ये नक्षत्राने स्वत:चाच विक्रम मोडित काढून नवीन विक्रम स्थापन केला.

निकाल पुढीलप्रमाणे
- कि.मी. हाफ मॅरेथॉन पुरूष गटात 1)रंगनाथ सी (सरकारी तांत्रिक महाविद्यालय रामनगर), 2)तिशान ए. एम. (केव्हीजी तांत्रिक महाविद्यालय मंगळूर), 3)प्रशांत एस. बी. (सरकारी तांत्रिक महाविद्यालय कुशलनगर)
- 100 मीटर धावणे : पुरूष 1) अभिरंजन एच. (विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय पुट्टूर), 2) लोहित (विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय पुट्टूर), 3)निरंजन पी. (आरएमस तांत्रिक महाविद्यालय बंगळूर)
- महिला गटात 21 कि. मी. हाफ मॅरेथॉन : 1) विद्या सी. एस. (विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय), 2) मंजुळा सुनागत (एसडीएम तांत्रिक महाविद्यालय धारवाड), 3)मंजुश्री. ए (विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय)
- 4×400 मिक्सरिले 1)विवेकानंद महाविद्यालय पुट्टूर, 2) सह्याद्री महाविद्यालय (मंगळूर), 3) एनएएएम निट्टे यांनी विजेतेपद पटकाविले.
ज्योती तांत्रिक महाविद्यालय बंगळूरच्या जीवन एनएमएने तिहेरी उडीत प्रथम व लांब उडीत द्वितीय क्रमांकासह 1596 गुणांसह पुरूष गटात वैयक्तीक विजेतेपद तर महिला गटात विवेकानंद पुट्टूर महाविद्यालयाची पवित्राजीने लांब उडी व तिहेरी उडी अनुक्रमांक प्रथक क्रमांकासह 1797 गुण मिळवित महिला गटात वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत विवेकानंद तांत्रिक महाविद्यालयाने प्ट्टूर संघाने 136 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद एनएएमएन महाविद्यालयाने 61 गुणासह दुसरा क्रमांक, सह्याद्री महाविद्यालय मंगळूरने 40 गुणांसह तिसरा क्रमांक श्रीनिवास तांत्रिक महाविद्यालय मंगळूरने 22 गुणासह चौथा क्रमांक तर एसडीएम धारवाड व कॅनरा महाविद्यालय मंगळूर अनुक्रमे पाचवा क्रमांक पटकाविला. बक्षिस वितरणप्रसंगी प्रमुख पाहूणे बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, व्हीटीयूचे उपकुलगुरु प्रा. विद्या शंकर एस., व्हीटीयूचे व स्पर्धा सचिव डॉ. पी. पट्टस्वामीगौडा, एम. ए. सपना, प्रा. टी. एन. श्रीनिवास, बी. ई. रंगस्वामी यांच्याहस्ते विजेत्या महाविद्यालयाना व विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी एम. बी. बोरलिंगय्या यांनी खेळाडूना मार्गदर्शन करताना म्हणाले. तांत्रिक शिक्षण घेताना शिक्षणाबरोबर खेळाकडेही लक्ष देणे ही काळाची गरज बनली आही. कारण विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ बनने गरजेचे असते. अभ्यासाच्या तणावामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. त्यासाठी अभ्यासकरीत खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्पर्धेत भाग घेऊन पदक मिळविलेल्या स्पर्धकांचे कौतुक त्यांनी केले. यावेळी व्हीटीयूचे क्रीडा सहाय्यक निर्देशक डॉ. मधुकर देसाईसह महाविद्यालयाचे सर्व क्रीडा प्राध्यापक व इतर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्राध्यापक, क्रीडा शिक्षक व क्रीडा प्राध्यापक विशेष परिश्रम घेतले.









