बेळगाव – बेळगाव महापालिकेचे सर्वसाधारण बैठक उद्या शनिवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. बैठकीच्या अजेंड्यावर सात विषय घेण्यात आले आहेत. यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहतीचे महापालिकडे हस्तांतरण करण्याचा विषय महत्त्वाचा आहे.आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडून हा विषय घेण्यात आला आहे.
गोवावेस येथील जलतरण तलावाजवळ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणे, जीना बकुल येथील चौकाला महर्षी वाल्मिक यांचे नाव देणे, देवराज कॉलनीतील भूखंडांची बेकायदेशीर खरेदी, तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्याचे विषयही अजंड्यावर आहे. गणेशोत्सवाच्या आधी बैठक घेऊन या विषयांना मंजूरी देण्याचे सत्ताधारी गटाचे नियोजन आहे.









