बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक मुकुल सरन माथूर यांनी बुधवारी बेळगाव-मिरज दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पाहणी केली. दुपदरीकरण व विद्युतीकरणानंतर रेल्वेची वाहतूक वाढली असल्याने रेल्वे प्रवास सोयीचा व्हावा, कोठेही कमतरता राहू नये, यासाठी पाहणी करण्यात आली. त्यांच्यासोबत नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागीय व्यवस्थापक बेला मीना देखील उपस्थित होत्या. बेळगाव ते मिरज या दरम्यानच्या रेल्वे मार्गासोबत रेल्वे स्थानकांचीही पाहणी केली. रेल्वेच्या सर्वेक्षण डब्यातून पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर बेळगाव रेल्वे स्थानक येथेही सरव्यवस्थापकांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
गोकाक रोड रेल्वे स्थानकाला भेट
गोकाक रोड रेल्वे स्थानकाचा नुकताच विकास करण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकावरील सुविधांची पाहणी बुधवारी नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक मुकुल सरन माथूर यांनी केली. रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रुमसोबत फूटओव्हर ब्रीज, प्लॅटफॉर्म, तिकीट काऊंटरची पाहणी करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासंदर्भात खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली.









