देहराडून
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना उत्तराखंड गौरव सन्मान (मरणोत्तर) देण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष-गीतकार प्रसून जोशी, प्रसिद्ध संगीतकार दिवंगत गिरीशचंद्र तिवारी गिरडा आणि साहित्यिक दिवंगत वीरेन डंगवाल यांचाही सन्मान उत्तराखंड सरकारतर्फे करण्यात येणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.









