सत्या’ या गाजलेल्या चित्रपटावर 27 वर्षांपूर्वी एकत्र काम केल्यावर मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. यावेळी हा हॉरर कॉमेडीपट असणार असून याचे नाव ‘पुलिस स्टेशन में भूत’ असेल. चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला आहे. चित्रपटात जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. ‘सत्या’ चित्रपटापासून आतापर्यंत काही प्रवास पूर्ण होण्यासाठीच निर्माण झाले आहेत. जवळपास तीन दशकानंतर राम गोपाल वर्मासोबत पुन्हा काम करता येत असल्याने रोमांचित असल्याचे मनोज वाजपेयीने म्हटले आहे.
जेनेलियाने देखील फर्स्ट लुक पोस्ट करत स्वत:ची उत्सुकता व्यक्त केली आहे. पहिल्यांदाच भीती आणि मस्तीचा मेळ असलेल्या चित्रपटात काम करणार आहे. रामगोपाल वर्माकडून दिग्दर्शित ‘पुलिस स्टेशन में भूत’ चित्रपटात मनोज वाजपेयीसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. हा चित्रपट थ्रिलर धाटणीचा असून याची कहाणी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी असल्याचे जेनेलियाने म्हटले आहे.









