मानव कौल चित्रपटात मुख्य भूमिकेत
जेनेलिया देशमुख आणि मानव कौल यांचा आगामी चित्रपट ‘ट्रायल पीरियड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात एका वेगळ्या कौटुंबिक व्यवस्थेची झलक दाखविण्यात आली आहे. याची कहाणी एका लहान मुलाच्या मागणीच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. या मुलाने स्वत:च्या आईसमोर वडिल हवेत असा हट्ट धरलेला असतो. चित्रपटात जेनेलियाने सिंगल मदर ‘एना’ची भूमिका साकारली आहे. तर 30 दिवसांसाठी वडिलाच्या स्वरुपात नियुक्त झालेल्या इसमाची भूमिका मानवने साकारली आहे.
अलेया सेनच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटात शक्ती कपूर, शीबा च•ा, गजराव राव आणि जिदान ब्रेज हे कलाकार देखील दिसून येणार आहेत. स्वत:च्या जीवनात पितृतुल्य व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एका मुलाच्या भावना दर्शविणारा हा चित्रपट आहे.

अधिक गुणवत्तापूर्ण असणाऱ्या भूमिका मी माझ्या कारकीर्दीतील या टप्प्यावर निवडत आहे. अलेयाने ट्रायल पीरियडची ऑफर दिल्यावर मी त्वरित होकार दिला. हा एका सिंगल मदरच्या स्वत:च्या प्रेमकहाणीच्या शोधाचा आहे. ही प्रेमकहाणी महाविद्यालयीन प्रेमकहाणींपेक्षा अत्यंत वेगळी असल्याचे जेनेलियाने म्हटले आहे.
ट्रायल पीरियड हा चित्रपट सर्वार्थाने वेगळा आहे. हा चित्रपट एक भावनात्मक रोलरकोस्टर आहे. याचबरोबर प्रतिभाशाली कलाकार आणि क्रोम पिक्चर्स टीमसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला होता असे मानव कौलने म्हटले आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.









