उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी दिली शपथ
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी भारतीय वांच्या गीता राव गुपत यांना विदेश मंत्रालयात महिलांशी संबंधित जागतिक मुद्द्यांसाठी ‘अॅम्बेसिडर अॅट लार्ज’पदाची शपथ दिली आहे. मे महिन्यात अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या मतदानात 51 मते मिळवत स्वत:च्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला होता.
जगभरात महिलांना असमानता आणि अपमानाला सामोरे जावे लागते, तसेच महिलांना अर्थव्यवस्थेत पूर्णपणे सामील होण्यापासून रोखले जाते. महिलांची सुरक्षा धोक्यात असून त्यांना सदैव हिंसेची भीती असते. संघर्ष, आपत्कालीन स्थिती आणि मानवी संकटाच्या स्थितीत महिला विशेष स्वरुपात असुरक्षित असतात असे गीता राव यांनी म्हटले आहे.
गीता राव यांच्या शपथविधीला त्यांचे पती अरविंद गुप्ता, मुलगी नयना गुप्ता, मंजुली माहेश्वरी आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. गीता राव यापूर्वी महिलांसाठीच्या 3डी कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालिका आणि संयुक्त राष्ट्रसंघ फौंडेशनच्या सदस्य होत्या. तसेच त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.









