येत्या 19 मे पासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
पर्वरी : तांत्रिक शिक्षण संचालनालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमातील इंजिनियरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी घेतलेल्या गोवा समान प्रवेश परीक्षेचा (जीसीईटी) निकाल काल बुधवारी शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनी जाहीर केला. परीक्षेसाठी एकूण 3224 विद्यार्थी बसले होते. मागच्या वर्षी 3055 विद्यार्थी बसले होते. यावर्षी 169 विद्यार्थी जास्त बसले. डॉ. व्ही. एन. शेट (प्राचार्य, गोवा इंजिनियरिंग कॉलेज) यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील सोळा केंद्रावर दि. 13 व 14 मे 2023 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञान आणि गणित या विषयावर आधारित होती. आय. आय. टी. मुंबई यांनी ही परीक्षा घेण्यासाठी सहकार्य केले होते. यंदाच्या गोवा समान प्रवेश परीक्षेच्या विषयावर आकडेवारीतील ठळक मुद्धे : भौतिकशास्त्र विषयात एकूण 3224 मुलांपैकी 3089 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात सर्वाधिक 61 गुण तर कमीत कमी 6 गुण मिळाले आहेत. सरासरी उत्तीर्ण टक्केवारी 22.68 इतकी आहे. पदार्थ विज्ञान या विषयात एकूण 3224 मुलांपैकी 3088 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात सर्वाधिक 70 गुण तर कमीत कमी 11 गुण मिळाले आहेत. उत्तीर्ण सरासरी टक्केवारी 27.97 इतकी आहे. गणित विषयात एकूण 2476 मुलांपैकी 2373 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात सर्वाधिक 71 गुण तर कमीत कमी 8 गुण मिळाले आहेत. उत्तीर्ण सरासरी टक्केवारी 27.77 इतकी आहे. यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेने उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत किंचित घसरण झाली आहे.
भौतिकशास्त्रातील पहिले पाच विद्यार्थी
प्रत्येक विषयातील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. भौतिकशास्त्र या विषयात प्रथम :अदिप सिद्धार्थ सिनाई कुंकळीकर (गुण 61), द्वितीय : अथर्व विजय नाईक (गुण 56), द्वितीय : वारेन बोनीफासीओ तावरिस (गुण 56 ), चौथा : पलाश द्वारकानाथ आंगले (गुण 54 ), पाचवा : श्रेयश पंकज चव्हाण (गुण 52) पाचवा : वैष्णवी युवराज पोतेकर (गुण 52).
पदार्थ विज्ञानातील पहिले पाच विद्यार्थी
पदार्थ विज्ञान या विषयात – प्रथम : अथर्व विजय नाईक (गुण 70 ), द्वितीय : आर्यन सिद्धेश सिनाई काकोडकर (गुण 65), व्दितीय : सुदिन कौशल (गुण 65 ), व्दितीय : नंदिनी सिद्धेश रांगणेकर (गुण 65), व्दितीय : अदिप सिद्धार्थ सिनाई कुंकळीकर (गुण 65 ), द्वितीय : पलाश द्वारकानाथ आंगले (गुण 65 ), द्वितीय :विश्वेश वासुदेव सावंत (गुण 65).
गणित विषयातील पहिले पाच विद्यार्थी
गणित या विषयात प्रथम : हेमानशिनी निनाद देसाई (गुण 71 ), व्दितीय: श्रेयश पंकज चव्हाण (गुण 70), व्दितीय: वारेन बोनीफासीओ तावरिस (गुण 70 ), चौथा : पालाश द्वारकानाथ आंगले (गुण 69), पाचवा : अदिप सिद्धार्थ सिनाई कुंकळीकर (गुण 68). विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी 19 मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरवात होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत, गोवा इंजिनियरिंग कॉलेजचे डॉ. व्ही एन. शेट, आय. आय.टा.r मुंबईचे प्रा. एस. एस. मेजर, डॉ. प्रदीप कुसनूर, डॉ. दीपक गायतोंडे उपस्थित होते.









