वृत्तसंस्था/ बॅसेल (स्वीस)
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2023 च्या स्वीस खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि ट्रेसा जॉली यांचे आव्हान महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
इंडोनेशियाच्या अप्रियानी रेहायू आणि सिटी सिल्वा रामदंती यांनी गायत्री व ट्रेसा जॉली यांचा महिला दुहेरीच्या पहिल्याच फेरीत 21-14, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. गायत्री आणि टेसा यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या अखिल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारली होती. त्याचप्रमाणे स्वीसच्या या स्पर्धेत मिश्र दुहेरीत चीन तैपेईच्या चियु चेह आणि लिन मीन यांनी भारताच्या अश्विनी पोनाप्पा व सुमित रे•ाr यांचा 22-20, 21-12 असा फडशा पाडला.









