म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी खोऱ्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून धामणी नदीवरील गवशी (ता. राधानगरी ) येथील बंधारा आज सकाळ पासून पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
सध्या मुसळधार पाऊस सुरू असून नदीला मोठा पूर आलेला आहे. धामणी नदी धोका पातळी सोडून वाहत आहे. परिणामी नदीकाठावरील ऊस पिके पाण्याखाली जात आहे.असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास धामणी नदीवरील म्हासुर्ली, शेळोशी, कडवे- गारिवडे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच गगनबावडा- कोल्हापूर मार्गावर काही ठिकाणी पुराचे पाणी आले असले तरी पर्याय म्हणून कोल्हापूर येथून होणारी वाहतूक कळे – सुळे – भित्तमवाडी – म्हासुर्ली ते बावेली- गारीवडे मार्गावरून तसेच परिते – चांदे – कोते ते म्हासुर्ली मार्गे गगनबावडा व कोकणकडे सुरु आहे. त्यामुळे कोकण व शहराकडे जाणाऱ्या प्रवाशाची गैर सोय टळली आहे.









