Dry Mango Pickle Recipe: उन्हाळा सुरू झाला की वर्षभरासाठी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीच्या लोणच्याची तयारी सुरु होते. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने कैरीचं लोणचं केलं जातं.पण जर तुम्ही कैरीचे लोणचे फक्त भरपूर तेल असल्यामुळे खाणे टाळत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. आज आपण कमी तेलात सुक्या कैरीचे भन्नाट चवीचं गावरान लोणचे कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत.
साहित्य
५०० ग्राम कैरी
२ टीस्पून मीठ
१ टीस्पून हळद
मसाल्यासाठी साहित्य
१/४ कप मोहरीचे तेल
१ टीस्पून मीठ
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून ओवा
२ टेबलस्पून मेथी दाणे
२ टेबलस्पून बडीशेप
२ टेबलस्पून बारीक वाटलेली मोहरी
कृती
लोणचे बनवण्यासाठी आदल्या रात्री ताज्या कैरी धुवून पाण्यात भिजवावेत. दुसऱ्या दिवशी कैरी पाण्यातून बाहेर काढा. ते पुन्हा धुवा आणि कोरडे करा. नंतर त्याचे मोठे मोठे तुकडे करा. आता एका मोठ्या भांड्यात कैरीचे तुकडे काढून त्यात हळद आणि मीठ टाका आणि दोन्ही हातांच्या मदतीने चांगले मिक्स करा. आता या कैरी काचेच्या भांड्यात किंवा एअर टाईट डब्यात भरून २ दिवस भरून ठेवा. असे केल्याने कैरी थोडीशी मुरेल. मधून मधून लोणचे चमच्याने ढवळत रहा.२ दिवसांनी लोणचे एका मोठ्या ताटात काढून उन्हात वाळवावे. आता या लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मेथी, बडीशेप, ओवा आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या आणि त्यात थोडी मोहरी पूड घाला. यानंतर एका कढईत तेल टाका आणि चांगले गरम केल्यानंतर गॅस बंद करा.तेल थंड होऊ द्या.आता हिंग आणि इतर मसाले एकत्र करून त्यात लाल तिखट घाला आणि हा मसाला करीच्या तुकड्यांमध्ये घालून मिक्स करा. करीच्या प्रत्येक तुकड्याला मसाला नीट लागायला हवा. यानंतर थंड केलेले सर्व तेल त्या तुकड्यांमध्ये घालून पुन्हा एकदा मिक्स करा.तुमचे चविष्ट कैरीचे,कमी तेलाचे कोरडे लोणचे तयार आहे. हे एअर टाइट डब्यात साठवा. तुम्ही मध्ये मध्ये हे उन्हात ठेवू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









