वेंगुर्ले (वार्ताहर)-
गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत वेंगुर्ले शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात आमदार, गृह, ग्रामविकास व अर्थ राज्यमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेतच .केवळ रस्ते, वीज हे नेहमीचीच विकास कामे आहेत. पण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मंत्री म्हणून दीपक केसरकर यांना मिळालेल्या संधीमुळे कॅबिनेट बैठकित महत्वपूर्ण विविधांगी व सर्वसामान्यांना आवश्यक असणारी अशी सुमारे १०० कोटी रूपयांच्या विकास कामांना त्यांनी निधी देवून कामे मार्गस्थ केली आहेत. हा त्यांचा विकास कामांचा धडाका पाहुन सोमवारी वेंगुर्लेत स्वामीनी मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांत तालुक्यासह शहरातील शेकडो कार्यकर्ते त्यांच्या विकास कामांच्या धडाकेबाज कामांवर प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्लेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वेंगुर्ले नगरवाचनालयाच्या सभागृहात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यापासून १०० कोटी रूपयांच्या निधी मंजुरीतून तालुक्यासह शहरात केलेल्या अन्य आठ दिवसांत मंजुरी मिळालेल्या कामांची माहिती व दिपक केसरकर यांच्या या कामांमुळे शिवसेनेत होणाऱ्या पक्षप्रवेश संदर्भात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांत वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील मोरजकर, सुनिल डुबळे, शहर महिला संघटक अँड श्रध्दा बावीस्कर, शबाना शेख, युवा शहर प्रमुख संतोष परब, प्रभाकर पडते, राजू परब यांचा समावेश होता.
श्री वालावलकर पुढे म्हणाले, शालेय शिक्षण मंत्री पदाचा कारभार करताना या जिल्ह्यातील युवक-युवतींना शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचा फायदा भविष्यासाठी व्हावा यादृष्टीने शिक्षणात अमुलाग्र बदल करण्याचा अभ्यास करूनचा प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विरोधी पक्षातील आमदार व नेते यांना विश्वासात घेऊन ते चर्चा करीत आहेत. अलिकडेच त्यांनी शरद पवार साहेब यांचाही याबाबत सल्ला घेतल्याचे स्पष्ट केले. गेल्या ८ दिवसांत वेंगुर्ले शहरात मुंबई प्रमाणेच वृध्दांसाठी विरंगण केंद्रास १ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यात वृद्धांसाठी व्यायाम साधने, पिण्याचे पाणी, बगीच्या, शौचालय व बाथरूमच्या सुविधा, शहरातील रस्त्यावर स्ट्रीट लाईटसाठी नवीन पोल व नवीन लाईट याकरिता १.५० कोटी तसेच असंख्य वर्षाचा जीर्ण झालेला पत्र्याचा हा वाहतुकीस सुसज्ज असा व्हावा, याकरिता १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून या पत्रे नगरपरीषदेला प्राप्त झालेली आहेत. तसेच शहरातील नागरीकांना वर्षभर पाणी पुरवठा करणाऱ्या निशान तलावासाठी अत्यल्प मोबदल्यात जमिनी देणाऱ्या भुमीपुत्रांना त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता अद्याप केली गेलेली नाही. त्यात अत्यावश्यक अशी आश्वासनांची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे शहरांस पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटीश कालीन ‘नारायण तलावा’चे काम ही करण्यासाठी जलसंधारणमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे प्रस्ताव दिलेला असून चर्चाही केसरकर यांनी केलेली आहे. हे कामही येत्या कांही कालावधीत पुर्णत्वास येऊन कायम स्वरूपी शहर वासियांच्या पिण्याच्या पाण्याचीसमस्या सुटेल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात मोठी जागा व स्वच्छ असलेल्या राज्यपरीवहन मंडळाच्या वेंगुर्ला आगाराचा सर्वागीण विकासासाठी २ कोटी रूपयांचा निधी श्री केसरकर यांनी मंजूर केलेला असून डेपो सुशेभिकरण, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शौचालय बाथरूम, कॅन्टीन सह अन्य सुविधा तेथे होणार आहेत. वेंगुर्ले शहर दाभोली नाका नजीकच्या चर्चच्या स्मशानभूमी सुशोभीकरण विकासासाठी ३० लाखाचा निधीही श्री केसरकर यांनी दिला असल्याची माहिती श्री. वालावलकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.
सोमवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत दिड कोटी मंजूर निधीतून होणाऱ्या कामाचा शुभारंभ होणार आहे. तर १० वाजता येथील स्वामीनी मंगल कार्यालयात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात दिड वर्षातील विविधांगी कामाचा धडाका पाहून प्रभावित झालेले विविध पक्षातील महिला, युवक व जेष्ठा कार्यकर्ते व जागृक नागरीक शेकडोंच्या संख्येने केसरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. या तालुक्यातील व शहरातील अन्य ज्या व्यक्तींचा केसरकर करीत कामांचाबाबत चांगले काम म्हणून त्यांच्या सोबत रहावयाचे असेल अशांनी सुध्दा त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करून केसरकर यांच्या विकासाला अधिक बळकटी द्यावी. असे आवाहनही सचिन वालावलकर यांनी केले आहे.









