Sushmita Sen: बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने हॉटस्टारच्या वेब सीरिज ‘आर्या’मध्ये दमदार परफॉर्मन्स दिल्यानंतर आता ‘टाली’ या नव्या वेब सीरिजमध्ये ती दिसणार आहे. यामध्ये तिने तृतीयपंथीयाची भूमिका साकारली आहे. ‘टाली’ ही वेब सिरिज रवी जाधव दिग्दर्शित करणार आहेत. आज त्याची एक झलक सोशल मिडियावर तसेच रवी जाधव आणि सुष्मिता सेन हिने पोस्ट केली आहे. ज्याची चर्चा सर्वच स्थरातून होत आहे.
आजवर तृतीयपंथीयांचा अभिनय पुरुष अभिनेत्यानेच केलेला आपण पाहिला आहे. पण पहिल्यांदाच एक अभिनेत्री तृतीय पंथीयाची भूमिका करणार आहे. या जिवनपटामध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. सुश्मिताने गौरीच्या लुक मधील फोटो शेअर करत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ‘टाली – बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी !’ असे तिने म्हंटले आहे. आता या वेब सिरिजचा टीझर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गौरी सावंत कोण आहेत?
काही वर्षांपूर्वी ‘विक्स’ कंपनीच्या जाहिरातीतून एक तृतीयपंथी समोर आली. ती म्हणजे गौरी सावंत. एका तृतीयपंथीयाच्या आयुष्याचा संघर्ष, त्यांचं म्हणणं या जाहिरातीतून जगासमोर आलं आणि गौरी सावंत हे नाव घराघरात पोहोचलं. त्यानंतर गौरीने भोगलेलं दुःख, तिचा संघर्ष, कुटुंबाकडून झालेली अवहेलना, वेळप्रसंगी करावा लागणारा वेश्याव्यवसाय हे सारंच जगासमोर आलं. आज हाच संघर्ष वेब सिरिजच्या माध्यमातून समोर येणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









