सांगली
कुंडल (ता. पलूस) येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षल सदागिर विरुद्ध गौरव मच्छिवारा पंजाब यांच्यात झाली यामध्ये हफ्ता डावावर गौरव माच्छिवाराने ११ व्या मिनिटाला हर्षल सदा†गर याला चितपट केले. या कुस्तीला पंच म्हणून संतोष वेताळ यांनी काम पाहिले.
दुसऱ्या मिनिटाला हर्षलने पट घेत गौरवला खाली खेचले पण त्याने यशस्वीपणे निघून गेला. दोन्ही पैलवानात बराचवेळ खडाखडी सुरू होती. यानंतर माऊली जमदाडे विरुद्घ प्रिन्स कोहली यांच्यात झालेली कुस्तीत चौथ्या मिनिटाला प्रिन्स कोहलीने माऊली वर घिस्सा डावावर विजय मिळवला. या कुस्तीला पंच म्हणून मेहबूब शेख यांनी काम पाहिले.
महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्यात झालेल्या कुस्तीत महेंद्र गायकवाड पुट्टी डावावर दहाव्या मिनिटाला विजयी झाला. या कुस्तीला मेहबूब शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले. दादा शेळके विरुद्ध ललू जम्मू यांच्यातील कुस्ती 30 मिनिटांनी गुणावर लावली. दादा शेळके आक्रमक झाला आणि दुसऱ्या मिनिटाला दादा शेळके गुणांवर विजयी झाला. या कुस्तीला पंच म्हणून सुनील मोहिते यांनी काम पाहिले.
यासह, इतर चटकदार कुस्त्यात रविराज चव्हाण विरुद्ध अभिनव नायक यांच्यातील कुस्ती प्रेक्षणीय झाली. प्रथम अभिनव ने छडी टांग करत कुस्तीत रंगत आणली. हा डाव पलटवार करत एकेरी कसावर चौथ्या मिनिटानंतर राविराज चव्हाणने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सनी मदने विरुद्ध नवीन कुमार यांच्यात कुस्ती झाली यामध्ये सनी मदने हा घुटना डावावर विजयी झाला. ओंकार मदने विरुद्ध विनायक वाल्हेकर यांच्यातील कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला ओंकार मदने हा डंकी डावावर विजयी झाला. सतपाल शिंदे विरुद्ध अनिल बामणे याच्यात झालेल्या झुंजीत तिसऱ्या मिनिटाला सतपाल शिंदे हफ्ते डावावर विजयी झाला.
वैभव माने विरुद्ध महारुद्र काळेल, कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे, भारत पवार विरुद्ध निकेतन पाटील यांच्यातील कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या. कालीचरण सोलनकर विरुद्ध धीरज पवार यांच्यातील कुस्तीमध्ये धीरज पवार जखमी झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
रणरागिणी झुंजल्या..
यंदा या मैदानात निकाली महिला कुस्त्याही झाल्या. नेहा शर्मा विरुद्ध धनश्री फंड यांच्यात कुस्ती झाली. सुरुवातीला नेहाने मोळी बांधण्याचा प्रयत्न केला. पण आठ मिनिटांच्या खडखडीनंतर कुस्ती बरोबरीत सोडवली. मुस्कान रोहतक विरुद्घ पूजा लोंढे यांच्यात कुस्ती झाली यामध्ये एकेरी कसावर अवघ्या दुसऱ्या मिनिटांनी मुस्कान रोहतक विजयी झाली वेदांतिका पवाराविरुद्ध दिशा मलिक यांच्यात कुस्ती झाली पणं बरोबरीत सोडवली. वैष्णवी पवार विरुद्घ रिया भोसले यांच्यात कुस्ती झाली यामध्ये रिया भोसलेने पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवला. महिलांच्या कुस्तींने प्रेक्षकांनी प्रोत्साहन देत महिला कुस्तीगीर यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे पुजन मान्यवरांच्या हस्ते होऊन मैदानास सुरुवात झाली. या मैदानात परिसरातून अनेक मान्यवरांनी भेट दिली. जोतीराम वाजे यांनी समालोचन केले. चटकदार कुस्त्यातून जिंकलेले पैलवान गौरव हजारे, अभिषेक घारगे, पृथ्वीराज पाटील यांचेसह अनेक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या.
एक हात नसणारा पैलवान विराज पाटील विरुद्ध प्रज्योत पटेल यांच्यात चटकदार कुस्ती झाली यांच्यात यात अपंग पैलवान विराज पाटील हा घिस्सा डावावर अवघ्या चौथ्या मिनिटाला विजयी झाला.
नुकताच झालेला महाराष्ट्र केसरी पृथ्विराज मोहोळ याची प्रथम क्रमांकाची कुस्ती गौरव मछवारा विरुद्ध ठरली होती पण तो सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असल्याने महाराष्ट्र कुस्ती मैदानात ऐनवेळी येण्यास नकार दिला..
बाळासाहेब लाड, अध्यक्ष सार्वजा†नक गणेशोत्सव मंडळ.








