वृत्तसंस्था/ अॅस्ताना (कझाकस्तान)
येथे सुरु असलेल्या इलोर्डा चषक आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या गौरव चौहानने पुरूषांच्या 92 किलोवरील वजन गटात उपांत्य फेरी गाठली. तर 63.5 किलो गटात अनुभवी शिवा थापाला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.
पुरूषांच्या 92 किलोवरील वजन गटात मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत गौरव चौहानने कझाकस्तानच्या डॅनियल सेपारबेचा 3-2 अशा गुणानी पराभव केला. या विजयामुळे गौरवने या स्पर्धेत किमान आपले कांस्यपदक निश्चित केले आहे. 63.5 किलो वजन गटातील लढतीत कझाकस्तानच्या अब्दुल्ला अलमातने शिवा थापाचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला. शिवा थापाने यापूर्वी 6 वेळेला आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळविले होते. 80 किलो वजन गटात चीनच्या टी. टेंग्लातेनने भारताच्या संजयचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरी गाठली.









