राधानगरी / महेश तिरवडे
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस असल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० भरले असून आज सकाळी 8 वाजून 15 मिनिटाने व 9 वाजून 10 मिनिटनी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजापैकी अनुक्रमे 6 व 5 क्रमाकांचा दरवाजा खुला झाला आहे. तर १० वाजून ०६ मिनिटांनी ३ आणि ४ क्रमांकाचा दरवाजा उघडला असून घऱणातून पॉवर हाऊससह एकूण 7112 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
धरणाच्या या दोन दरवाजा मधून 2856 क्यूसेक व खाजगी जलविद्युत केंद्रातून 1400 क्यूसेक असा एकूण 4256 क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी मिसळत असल्यामुळे नदी दुथडी वाहत आहे, असाच पावसाचा जोर राहिल्यास आणखीन दरवाजे पर्यत खुले होण्याची शक्यता आहे,
गेल्या वर्षी राधानगरी धरण 10 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते त्यावेळी सुरवातीला 3 दरवाजे खुले झाले होते, मात्र या वर्षी 15 दिवस अगोदर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता जलसंपदा विभागाच्या वतीने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे