पुणे / प्रतिनिधी :
देशभरातील आयआयटी, एनआयटी अशा केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या गेट आणि जॅम या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 3, 4, 10 आणि 11 फेब्रुवारीला गेट परीक्षा, तर 11 फेब्रुवारीला जॅम परीक्षा होणार आहेत.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) या संदर्भातील माहिती परिपत्रकाद्वारे दिली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत देशभरातील सात आयआयटी आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्यातर्फे गेट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा संगणक आधारित असते. गेट-2024च्या समितीच्या जुलैमध्ये झालेल्या बैठकीत गेट आणि जॅम परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. या परीक्षेच्या तारखा विचारात घेऊन तंत्रशिक्षण विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी त्यांच्या शैक्षणिक कामकाज, परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्याची सूचना एआयसीटीईने दिली.








