रत्नागिरी :
तालुक्यातील जयगड येथील गॅस टर्मिनल बांधकामावऊन बुधवारी पुन्हा एकदा जोरदार राडा झाल़ा कंपनीकडून शासनाचे आदेश डावलून बांधकाम होत असल्याची माहिती मिळताच नांदिवडे ग्रामस्थांकडून गॅस टर्मिनलकडे धाव घेण्यात आल़ी जाब विचारण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावलं असता त्यांनी आमचा एलपीजी गॅस टर्मिनलशी काही संबंध नाही, असा पवित्रा घेतल़ा यावेळी ग्रामस्थांनी मात्र आक्रमक होत करण्यात येत असलेले बांधकाम बंद पाडल़े या सर्व प्रकाराने जयगड परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होत़ी
मागील काही महिन्यांपासून जयगड येथील गॅस टर्मिनल व जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यात सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असल्याचे दिसून येत आह़े त्यातच नांदिवडे येथील शाळकरी मुलांना गॅस गळतीमुळे बाधा झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होत़ा तसेच गॅस टर्मिनल या ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी करण्यात आली होत़ी दरम्यान कंपनीकडून मात्र गॅस टर्मिनलचे बांधकाम थांबविणे अथवा ते अन्य ठिकाणी नेणे शक्य नसल्याचे सांगत बांधकामाला सुऊवात केली होत़ी यानंतर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होत़ा मात्र सागरी महामंडळाने गॅस टर्मिनलसाठी बांधकाम परवानगी दिली नसल्याचे सांगत बांधकामाला स्थगिती दिली होत़ी त्यामुळे ग्रामस्थांकडून करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले होत़े मात्र जिंदल कंपनीने स्थानिक लोकांचा विरोध असताना, कोणत्याही शासनाच्या विभागाची परवानगी न घेता गॅस टर्मिनलचे बांधकाम करत आहे, अशी माहिती मिळताच स्थानिक लोकांनी टर्मिनलच्या ठिकाणी धाव घेत बांधकाम बंद पाडल़े
जिंदल कंपनी मनमानी कऊन नांदिवडेच्या माथ्यावर वर लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच जिंदल कंपनीच्या कोळशाचे धूळ आणि राख याचा स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. श्वसनाच्या वाटे कोळशाची धूळ व राख याने लोक आजारग्रस्त झाले आहेत. नांदिवडे व जयगड परिसरात कॅन्सरग्रस्त रोगाचे ऊग्ण, त्वचेचे आजार असलेले ऊग्ण, श्वसनाचे आजार असलेले ऊग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. एवढा त्रास असूनही कंपनी गावामध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. शासनाने या सर्व गंभीर बाबीची दखल घेत लवकरात-लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित करावा आणि जिंदल कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आह़े








