तवंदी प्रतिनिधी : तवंदी घाटात पहिल्या वळणावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने गॅस टँकर दुभाजकाला धडक देत पलटी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत चालक गिरीकनाथ राजाराम यादव (वय 36, रा. उत्तरप्रदेश) याचे दोन्ही हात निकामी झाले. तर या वाहनातून प्रवास करणारे प्रवासी राहुल ज्योतिबा पोवार (वय 28) व रोहित शामराव खामकर (वय 25, दोघेहि राहणार शिप्पूर ता. हुक्केरी) दोघे हि किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, गॅस टँकर क्रमांक जी.जे.16 ए.यु. 7256 हा कोचीनहून गुजरातच्या दिशेने चालला होता. दरम्यान, तवंदी घाटात आल्यानंतर टँकर चालक गिरीकनाथ याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन जवळपास 50 फूट दुभाजकाला धडक देत पलटी झाले. यात शिप्पूर- तिठा येथे बसलेले प्रवासीहि वाहनात अडकून बसले होते. या घटनेची माहिती मिळताच जय हिंद कंपनीचे कर्मचारी अमोल नाईक निपाणी शहर ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक व्हीएस पुजारी, विजय पाटील, हवालदार हेमलता नाईक, एस. आर. मठद यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
या अपघातात गॅस टँकरचे सुमारे 3 लाखाहून अधिक नुकसान झाले. सर्व जखमींना महात्मा गांधी रुiणालयात दाखल करण्यात आले आहे . यावेळी नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. चालक गिरीकनाथ याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे . अधिक तपास शहर उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर करीत आहेत. घटनास्थळाची सुरक्षितता राखताना अग्नीशमन दलाच्यावतीने पाहणी करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









