शाहुवाडी, प्रतिनिधी
Kolhapur News : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर जुळेवाडी खिंडीच्या पुलानजिक गॅसने भरलेला टँकर पलटी झाला.आज पहाटे हा अपघात घडला. शाहुवाडी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्तकता घेत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे. मलकापूर-बांबवडे या ठिकाणी देखील वाहतुक रोखण्यात आली आहे. घटनास्थळावर आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन यंत्रणा पोहोचलेली आहे. महामार्गावरील वाहतूक सरूड-कोकरूड मार्गे वळवण्यात आलेली आहे. अनेक वेळा या पुलावर अपघात सदृश्य घटना घडल्याने आता तरी याकडे कोण लक्ष देणार का अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्यातून उमटत आहे.
Previous Articleपावसाचे पुनरागमन, राज्यभर यलो अलर्ट
Next Article गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी लावून गांजाची तस्करी









