बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमीतील गॅसवाहिनीला गळती लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. पाईपमधून गॅस जोराने बाहेर पडत असल्याने मोठा आवाज होत होता. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही वेळानंतर गॅसचा प्रवाह बंद करण्यात आला आणि दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. शनिवारी 12 च्या दरम्यान सदाशिवनगर स्मशानभूमीतील गॅसवाहिनीला गळती लागली. झाडे लावण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने ख•s खोदाई करण्यात येत होती. त्यावेळी भूमिगत घालण्यात आलेल्या गॅसवाहिनीला धक्का बसला आणि गळती लागली. यामुळे मोठ्याने आवाज झाला आणि गॅस बाहेर पडला. यामुळे नागरिकांना जवळ जाण्यास मनाई करण्यात आली.
पाईपलाच गळती लागल्याने काहीकाळ गोंधळ
गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. कर्मचारी घटनास्थळी पोहोचून गॅसप्रवाह बंद केला. त्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात आले. सदाशिवनगर स्मशानभूमीतील शवदाहिनीला गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाच गळती लागल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता.









