वृत्तसंस्था/ बागपत
उत्तर प्रदेशातील बागपत येथे यमुना नदीपात्रात गॅस पाईपलाईनला गळती झाल्याने सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नदीच्या मध्यभागी गॅस पाइपलाईन फुटल्यानंतर सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या मुसळधार पावसामुळे बागपतमधील यमुना नदीच्या पाण्याची पातळी धोक्मयाच्या चिन्हाजवळ आहे. येथे इंडियन ऑईलची गॅस पाइपलाईन नदीच्या मधोमध जाते. बुधवारी बागपत जिह्यातील जागोस गावाच्या मध्यभागी गॅस पाइपलाईन फुटली. पाइपलाईन फुटल्याने नदीच्या पाण्याच्या मध्यभागी धूर निघू लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून यमुना, गंगा, शारदासह अनेक नद्यांचे पाणी धोक्मयाच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे.