विनोद सावंत, कोल्हापूर
पंचगंगा स्मशासनभूमीतील गॅसदाहिनी वारंवार बिघाड होवून बंद पडत आहे. वापरात नसल्याने पार्ट खराब होत आहेत. सध्या बॉयलरमध्ये बिघाड असल्याने गॅसदाहिनी बंद ठेवली आहे. वापरच नसल्याने आणि महापालिकेकडून वेळेवर दुरूस्ती झाली नसल्याने 35 लाखांची गॅसदाहिनी स्क्रॅपच्या मार्गावर आहे.
महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प येथे स्मशासनभूमी आहेत. पंचगंगा स्मशानभूमीला धार्मिक महत्व असल्याने बहुतांशी मृतदेहांवर येथेच अंत्यसंस्कार होतात. पंचगंगा स्मशासनभूमीचे विस्तरीकरण काही कारणामुळे झालेली नाही. बेड वाढविता येत नसल्यामुळे काही वेळेस अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावे लागते. याची माहिती देवकर पाणंद येथे मुळचे राहणारे आणि सध्या व्यवसायामुळे गुजरातमध्ये स्थायिक झालेले राजेंद्र चव्हाण यांना मिळाली. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून महापालिकेला मोफत 35 लाखांची गॅसदाहिनी दिली. परंतू गॅसदाहिनी ऐवजी पारंपारिक शेणी-लाकूडनेच मृतदेह दहनाकडे सर्वांच कल आहे. यामुळेच गॅसदाहिनीचा फारसा वापर होताना दिसून येत नाही. वापर नसल्याने दाहिनीतील पार्ट खराब होत आहेत. सध्या बॉयलरमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने गॅसदाहिनी धुळखात पडून आहे. असेच चित्र राहिले तर गॅसदाहिनी स्क्रॅप होण्याचा धोका आहे.
कोरोनात चालते मग आता का नकार
कोरोनात तब्बल 1900 कोरोनाचे मृतदेह गॅसदाहिनीत दहन केले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी कोणाताच विरोध केला नाही. कोरोनानंतर सव्वा वर्षात केवळ 8 मृतदेह गॅसदाहिनीत दहन केली आहेत. यामुळेच कोरोनात गॅसदाहिनी चालते मग आता का नकार, असा प्रश्न उपस्थित होतो.
गॅसदाहिनीसाठी एकावेळी लागतात 10 गॅस सिलेंडर
सलग सात ते आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले तरच गॅसदाहिनीचा योग्य प्रकारे वापर होतो. गॅसदाहिनीसाठी एकावेळी 10 गॅस सिलेंडर उपलब्ध ठेवावे लागतात. यामुळे दिवसांत एक किंवा दोन मृतदेह गॅसदहन करणे परवडतही नाही आणि तांत्रिकदृष्य योग्य होत नाही.
जनजागृत्तीची गरज
भविष्यात शेणी लाकूड उपलब्ध होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे गॅसदाहिनी हाच पर्याय असणार आहे. मुंबई, पुण्यात गॅस दाहिनी, विद्युत दाहिनीचा वापर होतो. कोल्हापुरात मानसिकता बदलण्याची गरज आहे. मनपानेही यासंदर्भात जनजागृत्ती केली पाहिजे.
गॅस दाहिनी दुरूस्तीचे काम दोन दिवसांत होणार सुरू
गॅस दाहिनीमधील बॉयलरमध्ये बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बॉयलर मशिनच्या आत असल्याने पूर्ण मशिन उघडावे लागणार आहे. स्थानिक टेक्निशियनकडून दोन दिवसांत दुरूस्ती करण्यात येणार आहे.
सौरभ घावरी, आरोग्य निरीक्षक, मनपा
गॅसदाहिनी त्वरीत दुरूस्ती होणे आवश्यक
यामध्येच 1 ते 12 क्रमांकाचे बेडवरील शेड खराब झाले आहे. येथील पत्रे कोणत्याहीक्षण कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मनपाने 54 लाखांच्या बजेटमधून येथे दुरूस्ती केली जाणार आहे. दुरूस्तीवेळी बेडची संख्या अपुरी पडणार आहे. या दरम्यान, मनपाने गॅसदाहिनी सुरू करून ती वापरात आणली तर स्मशानभूमी ताण नक्कीच कमी होईल.
पंचगंगा स्मशानभूमीतील स्थिती
रोज मृतदेहांवर होणारे अंत्यसंस्कार-15 ते 20
बेडची संख्या-41
एका मृतदेहासाठी शेणी-लाकूड खर्च-2 हजार
एका मृतदेहासाठी लाकूड-120 किलो
एका मृतदेहासाठी शेणी -500 नग
एक मृतदेहासाठी गॅस दाहिनीवर खर्च -1500
गॅस दाहिनीवर आतापर्यत मृतदेह दहन-2050
कोरोनात गॅस दाहिनीमध्ये मृतदेह दहन-1900
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









