रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेट्ये नगर येथे आज पहाटे ५ वाजता गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून दोघे अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या स्फोटात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेस्क्युसाठी पोलीस सामाजिक कार्यकर्ते, रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी क्रेन मशिन देखील दाखल झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, स्फोट एवढा भीषण होता की, आजुबाजूच्या घरांवरही याचा परिमाण झाला आहे. या स्फोटामुळे शेजारच्या घरांच्या काचा उडून काहीजण जखमी झाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









