दिवाळी जवळ आली की वेध लागतात ते फराळाचे चकली, करंजी, लाडू, शंकरपाळी असे अनेक पदार्थ करण्याची लगबग प्रत्येक घरात दिसेत.फराळ सर्वात उत्तम तयार व्हावा तसेच तो खूप दिवस टिकावा यासाठी गृहिणी खूप मेहनत घेतात. दिवाळीच्या महत्त्वाच्या फराळात अनेक पदार्थ अॅड केले जातात. असाच एक तुमच्या आवडीचा फराळ आम्ही तुम्हाला कसा करायचा तो सांगणार आहोत. तो म्हणजे लसूण शेव. तुम्हाला कुरकुरीत आणि महिनाभर टिकणारी लसून पापडी (लसूण शेव ) कशी बनवावी याबाबत टिप्स देणार आहोत.
साहित्य –
-बारीक बेसन- 3 कप
-तांदळाचे पीठ- पाव कप
-लाल मिरची पावडर- 2 चमचे
-लसूण- 10 ते 12 पाकळ्या (याचे वाटण करूण घेणे)
-ओवा – पाव चमचा
-जिरं – पाव चमचा
-चवीनुसार मीठ
-तळण्यासाठी तेल
-हिंग- पाव चमचा
-हळद- पाव चमचा
कृती – कुरकुरीत लसूण शेव बनवण्यासाठी एका ताटात बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र करून मिक्स करून घ्या. त्यानंतर 4 चमचे तेल गरम करून त्यात घाला. आता तेल आणि दोन्ही पीठे चांगली मिक्स करून घ्या. यात लाल तिखट, हिंग, हळद, बारीक केलेला ओवा-जिरे पावडर, लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घाला. आता पुन्हा हे मिश्रण एकत्र करा. त्यानंतर साधे पाणी घालून पीठ एकजीव करून घ्या. पीठ खूप घट्ट करू नका.थोड पातळ करून घ्या. त्यानंतर साच्याला तेल लावून घ्या. आता त्यात मिश्रण भरून घ्या. गॅसवर कढईत तेल चांगले तापले की त्यात शेवया पाडून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा आणि शेवया चांगल्या तळून घ्या. हि शेव हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा. महिनाभर कुरकुरीत शेवचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.
टीप-
-शेव तयार करताना पीठ घट्ट करू नका पाणी घालून सैल असा गोळा तयार करून घ्यावा.
-शेव तळत असताना गॅस मंद आचेवर ठेवा.
-शेव तळाताना ती कच्ची राहणार नाही आणि खूप भाजली पण जाणार नाही याची काळजी घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









