प्रतिनिधी/ बेळगाव
चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठीच्यावतीने सालाबादप्रमाणे देवरवाडी, ता. चंदगड येथील वैजनाथ देवस्थानला अभिषेक घालण्यात आला. वैजनाथाला महाआरती करून पार्वती पूजन करण्यात आले. चांगला पाऊस होऊ दे, रोगराई नष्ट होऊ दे, असे गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर महाप्रसाद पार पडला.
सासनकाठीचे पुजारी लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते विधी करण्यात आले. यावेळी नागेश नाईक, आनंद आपटेकर, जोतिबा किल्लेकर, नामदेव नाईक, परशराम किल्लेकर, अनिकेत घोरपडे, अशोक कंग्राळकर यासह इतर भाविक उपस्थित होते.









