प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने शुक्रवारी लक्ष्मीटेकडी येथील महालक्ष्मी मंदिरात पावसासाठी गाऱहाणे घालण्यात आले. यावषी शेतकऱयांच्या पिकांना पोषक पाऊसपाणी होऊदे, असे गाऱहाणे देवस्थान पंच मंडळाच्या वतीने घालण्यात आले. आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी गणपत चौगुले, परशराम माळी, विजय तमुचे, अशोक कंग्राळकर, विठ्ठल पाटील, महेश मुतकेकर, गजानन चौगुले, सागर मुतकेकर, चंदू बाडीवाले, लक्ष्मण किल्लेकर, आनंद आपटेकर यासह इतर उपस्थित होते.









