16 ऑक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ तर 6 नोव्हेंबरला मतदान
गारगोटी प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी व सर्वाधिक महसुली ग्रामपंचायत गारगोटी निवडणूक जाहीर झाली असून 6 नोव्हेंबरला मतदान होत असुन लोकनियुक्त सरपंच पद खुल्या वर्गासाठी आरक्षित असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
गारगोटी ग्रामपंचायत निवडणूक थेट सरपंच पद व १७ सदस्यांच्या करिता ही निवडणूक होत असुन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी शिरीष भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे १६ आक्टोबर २०२३ ते २० आक्टोबर २०२३ पर्यंत उमेदवारी अर्ज उमेदवारांनी मौनी विद्यापीठ येथे महात्मा फुले सदन येथे भरणे.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन (संगणक) प्रणालीने भरून निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावा लागणार आहे. महात्मा फुले सदन येथे दिनाक २३ आकटोबर २०२३ सोमवारी सकाळी ११ वाजता छाननी होईल .
उमेदवारी मागे घेणे तारीख २५ ऑक्टोबर बुधवारी ३ वाजेपर्यंत राहिल. माघारीनंतर निवडणूक चिन्ह वाटप बुधवारी २५ /१०/२०२३ रोजी दुपारी ३ नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.निवडणूक मतदान नोव्हेंबर ५ रोजी सकाळी साडेसात वाजता सुरू ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होईल .मतमोजणी दिनांक ६/११/२०२३ रोजी मौनी विद्यापीठ परिसर येथे होईल.









