सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कुलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. गार्गी किरण सावंत हिने भारतीय संगीत कलापीठ तर्फे झालेल्या पखवाज वादन विशारद परीक्षेत ए प्लस श्रेणी प्राप्त करत उत्कृष्ट यश संपादन केले असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे . सिंधुदुर्गातील नामवंत पखवाज अलंकार प्राप्त श्री महेश सावंत यांच्या जगन्नाथ संगीत विद्यालयातून पखवाज वादनाचे गार्गी धडे घेत आहे.तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री समीर परब, संस्थेचे कार्याध्यक्ष विकास सावंत, कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब नंदीहळी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या









