गोडोली :
महामार्गालगत असलेल्या वेण्णा नवीपुलाच्या बाजूला सेवा रस्त्याच्या बाजूला बहुधा आसामींनी जागा खरेदी करून टेवलेली आहे. वाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या याच जागेवर कंपाऊंड नसल्याने या ठिकाणी सर्व प्रकारचा कचरा, परिसरातील हॉटेलमधील खराब झालेले, खरकटे अन्न टाकले जाते. अज्ञाताकडून माती टाकली जाते. टाकलेला कचरा आता रस्त्यावर आल्याने विद्यार्थी, महिला, मुलांसह येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधी, चिखलातून ये जा करावे लागते. तर सायंकाळी याच ठिकाणी सुरू असलेल्या हिडीस प्रकारामुळे आधीच हा परिसर डेंजर झोन समजला जातो. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाळे ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. तर अब्जाधिश असलेल्या या जागेच्या खाजगी मालकांना याचे घेणे देणे नाही, रस्त्यावर आलेला कचरा, माती, रस्त्याला पडलेल्या खकुगातील पाणी, त्यामुळे हा डेंजर झोन परिसर अधिक डेंजर होऊ लागला आहे. यावर आता कारवाईचा फास आवळा, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक, नागरिकांनी तरुण भारत’शी बोलताना केली आहे.
सातारा शहराचे प्रवेशव्दार असलेल्या महामार्गालगत सेवा रस्त्याच्या बाजूला वाढे फाट्यावरील वेण्णा नदीच्या काठावर खाजगी जागा आहे. या जागेबर शहर आणि परिसरातील सर्व प्रकारचा कचरा, माती, बादाड टाकले जाते. तर या परिसरातील हॉटेल व्यावसायिक रोजचा कचरा आणि खरकटे टाकत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकलेला कचरा सेवा रस्त्यावर आल्याने ये जा करणारांना त्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागतो, तर हाथ कचरा वाऱ्याने आणि पावसाच्या पाण्यासोबत थेट वेण्णा नदीपात्रात मिसळून पाणी प्रदूषण होते. हेच प्रदूषित पाणी पुढे कृष्णा नदीत जावून पिण्याच्या पाण्याला प्रदुषित करत आहे. याची आजपर्यंत एका ही लोकप्रतिनिधीनी गांमियनि दखल घेतली नाही तर सातारा शहरातील बड्या आसामींची ही खाजगी जागा असल्याने वाढे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून ही संबंधितावर कारवाईसाठी ग्रामपंचायतीकडून कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही.
गेल्या तीन आठवडयापुर्वी मोठ्या प्रमाणावर या जागेत माती परिसरातील हॉटेलमधील खरकटे, सर्व प्रकारचा कचरा टाकण्यात आला होता. गेल्या आठवडयातील पावसाच्या पाण्याने काही प्रमाणात त्यातील कबरा बेट नदीपात्रात तर काही प्रमाणात रस्त्यावर आल्याने चिखल, दुर्गंधी पसरली आहे. यातून नागरिकांना ये जा करावी लागते. तर आधीच सांयकाळी या जागेत राजरोस हिडीस प्रकार चालत असल्याने खाडेंजर झोन समजला जातो. त्यात रस्त्यावर दुर्गंधीयुक्त कचरा, माती आली असून नागरिकांना नाहकहोणान्या वासाबाबत ना ग्रामपंचायत ना जागा मालक ना प्रदुषण नियंत्रण मंडळ दखल घेत नाही
- खाजगी मालकांना देणार कायदेशीर नोटीस
सदर खाजगी जागा ही ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून संबंधित मालकांनी त्याला कंपाऊड करायला हवे. त्यांनी जागेवर माती, कचरा टाकण्यास प्रतिबंध केला पाहिजे. मालकांनी दुर्लक्ष केल्याने ही जागा बेवारस समजून हा कचरा पडतो. हाच कचरा नदीपात्रात जात असून पाणी प्रदूषण होत आहे. ‘त्या’ जागा मालकांना वाढे ग्रामपंचायतीकडून आधी नोटीस देणार आहे. योग्य कारवाई न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायती मागे पुढे पाहणार नाही.
– संदेश ढेकणे, सरपंच, वाढे








