तातडीने कचरा उचलण्याची मागणी
बेळगाव : टिळकवाडी न्यू शिवाजी कॉलनी येथे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. जवळजवळ हा परिसर म्हणजे कचरा डेपोच झाला आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे साम्राज्य वाढले आहे. मुख्य म्हणजे सध्या डेंग्यू आणि कावीळ या रोगांचे प्रमाण वाढले आहे. अस्वच्छतेमुळे हा पूर्ण परिसर दूषित झाला आहे. याबाबत संबंधितांकडे तक्रार करूनही वेळेवर कचरा उचल होत नाही. महानगरपालिकेने याची नोंद घेऊन येथील कचरा उचल करावी व हा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.









