दुर्गंधीने नागरिक त्रस्त, त्वरित हटविण्याची मागणी
वार्ताहर /मच्छे
पिरनवाडी येथील खानापूर रोडच्या बाजूला कचऱ्याचा ढिग पडला आहे.पिरनवाडीच्या भाजीमार्केटमधील टाकावू भाजीपाल्याचा कचरा व प्लास्टिकमधून दुर्गंधीयुक्त घरगुती केरकचरा टाकल्याने महामार्गाच्या बाजूने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सदर कचऱ्याची उचल नगरपंचायतीमार्फत होत होती. परंतु गेले पंधरा दिवस त्याकडे पिरनवाडी नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून दुर्गंधीयुक्त कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









