गुंजी : गुंजीजवळ रविवारी कचरावाहू ट्रक पलटी झाला होता. सोमवारी सायंकाळी व्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून ट्रकमधील कचरा दुसऱ्या ट्रकमध्ये भरुन नेण्यात आला. मात्र उर्वरित कचरा गुंजीजवळीलच रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आला तर ट्रक पलटी झालेल्या ठिकाणी पडलेला कचरा तसाच ठेवण्यात आला. त्यामुळे गावामध्ये दुर्गंधी पसरली आहे. तसेच गावापासून जवळच महामार्गाच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात आल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या दुर्गंधीचा त्रास होत आहे. तरी संबंधितांनी सदर कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून गावकरी आणि प्रवाशांना दुर्गंधीपासून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे.
Previous Articleउचगाव नागेशनगरमधील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा
Next Article पिरनवाडी नगरपंचायतीला लागून खोदलेली गटार धोकादायक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









