रत्नागिरी प्रतिनिधी
बरेच वर्ष बंद असलेली भारती शिपयार्ड कंपनी दुसऱ्या कंपनीने विकत घेतल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी आधी असलेले भंगार साफ करणे सुरू झाले आहे. पण या साफसफाईत असलेला कचरा मात्र तिथेच पुढे नेऊन समुद्राच्या किनारी टाकण्यात आला आहे . यावर वेळीच लक्ष दिले नाही तर हा कचरा हळूहळू समुद्रात जाण्याची शक्यता आहे.यावर मिऱ्या ग्रामपंचायतने दखल घेऊन कार्यवाही कराण्याची मागणी होत आहे .ही बाब लवकरात लवकर संबंधित लोकांना कळून यावर योग्य निर्णय घेऊन येऊ घातलेल्या नवीन कंपनीला वेळीच आळा घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.









