अज्ञात चोरटय़ांचा शिवभक्तांकडून शोध सुरु
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात सुमारे 28 गडकिल्ले आहेत. प्रत्येक गडकिल्यावर भटकंती करणारे, संवर्धन करणारे वेगवेगळे ग्रुप सातारा जिह्यात कार्यरत आहेत. अजिंक्यतारा किल्यावर सुद्धा अनेक ग्रुप नेहमी काम करत असतात. अनेक जण भेट देत असतात. याच किल्यावर असलेल्या महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता राहवी म्हणून शिवक्रांती संघटनेच्यावतीने प्लास्टिकच्या बॅरलच्या कचरा कुंडया लोखंडी ऍगलमध्ये फिट करुन बसवण्यात आल्या होत्या. त्याच कचराकुंडय़ा चोरटय़ांनी लांबवल्याची घटना रविवारी उघडकीस आली. त्याबाबत चोरटय़ावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिवक्रांती संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
सातारा शहर ज्या किल्याच्या पायथ्याला वसले आहे त्या अजिंक्यतारा किल्यावर दररोज जाणाऱया सातारकरांकडून स्वच्छता राखली जावी, होणारा कचरा हा कचरा पुंडीत टाकला जावा, तेथून त्या कचऱयाची योग्य विल्हेवाट लावावी हा उद्दात हेतू ठेवून शिवक्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच मोकळय़ा रिकाम्या बॅलरच्या कचरा कुंडय़ा लोखंडी ऍगलमध्ये फिट करुन ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अजिंक्यतारा गडावरील मंगळाई मंदिर, राजसदर, महादेव मंदिर, कैदखाना या ठिकाणी स्वच्छता राखली जात होती. दरम्यान, रविवारी शिवक्रांतीचे काही सदस्य गडावर गेले असता त्यांना एकही कचराकुंडी पहायला मिळाली नाही. तसेच लोखंडी ऍगलही गायब झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे ज्या चोरटयांनी कचरा कुंडया चोरल्या आहेत त्याचा अगोदर निषेध नोदंवला. त्यानंतर कचरा कुंडय़ांची शोध मोहिम हाती घेतली. परंतु त्या कचराकुंडया काही हाती लागल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
असल्या प्रवृत्तींचा बिमोड व्हावा
आम्हा शिवभक्तांची अस्मिता असलेल्या किल्ले अजिंक्यताऱयावर आम्ही संवर्धनाचे कार्य करत असतो. मोठी मेहनत घेत असतो. मात्र, काही अपप्रवृत्ती सोकावल्या आहेत. सदकार्याचे काम गडावर केले जात असताना विघ्नसंतोषी मंडळींनी कचरा कुंडय़ांची चोरी केली आहे. अशा प्रवृत्तींना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे. कचरा कुंडी चोरताना. असल्या प्रवृत्तींचा बिमोड झाला पाहिजे.









