तस्करांकडून 14 किलो 24 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त; जप्त गांजा 3 लाख 5 हजार 800 रूपये किंमतीचा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उडिसा राज्यातील दोघा गांजा तस्कारांना कबनूर (ता. हातकणंगले) येथे अटक केली. नाथ पुष्मा माझी (वय 33, रा. तांडरंग पोस्ट अंगुर, ता. नुगड, जि. गजपती, राज्य उडिसा), पिन्युएल डॅनियल रैत (वय 19, रा. सिकाबाडी पोस्ट संबलपूर, ता. नुगड, जि. गजपती, राज्य उडिसा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 3 लाख 5 हजार 800 ऊपये किंमतीचा 14 किलो 24 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 2 मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आला. या दोघा गांजा तस्काराविरोधी एनडीपीएस कायद्यातंर्गत गुन्हा दाखल कऊन, त्या दोघांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.
कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उडिसा राज्यातील दोघा गांजा तस्कारांना कबनूर (ता. हातकणंगले) येथे अटक केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, अशोक पवार, प्रकाश पाटील, सागर चौगले, आमित सर्जे, राजेश राठोड, महेश पाटील, राजू येडगे, शिवाजी मठपती, हबीर अतिग्रे, महादेव कुराडे आदीचा समावेश होता.