प्रतिनिधी गडहिंग्लज
Gadhinglaj Crime News : गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ कसबा नूल या गावात बेकादेशीररित्या अमली पदार्थाच्या विक्री बरोबर चक्क गांजाची लागवड होत असल्याचे समोर आले आहे. गांजाची बेकायदेशीर लागवड होत असल्याचे समजाताच शुक्रवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने धाड टाकत 75 झाडे जप्त केली आहे. हा गांजा लागवड केल्याप्रकरणी दोंघा संशयीतांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाअसून संशयीत दोघेही फरार आहेत. या धाडीत 7 लाख 57 हजार 50 रूपयाचा 107 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाई सर्वत्र खळबळ उडाली असून अमली पदार्थाच्या विक्री बरोबर आता तालुक्यात गांजाची लागवड होत असल्याचे समोर आहे आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- विट्यात अल्पवयीन मुलाकडे आढळले देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुस
गडहिंग्लज-संकेश्वर या आंतरराज्यमार्गावर हेब्बाळ कसबा नूल या गावानजीकच हसुर चंपू रोड लगत उसाच्या शेतालगत विष्णू सर्रजाप्पा पिराप गोळ (ऊर्फ कांबळे) काश्याप्पा विष्णू पिराप गोळ (ऊर्फ कांबळे) यांनी गांज्याची लागवड केल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सापळा रचत गांजाची 75 झाडे जप्त केली आहेत. लागवड करणारे संशयीत दोघे आरोपी फरार असून महेश मनोहर गवळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीसात दोघां विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.









