रुग्णालयात करावे लागले दाखल
वृत्तसंस्था/ भटिंडा
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला सोमवारी रात्री उशिरा भटिंडा तुरुंगातून फरिदकोटच्या गुरु गोविंद सिंह रुग्णालयात दाखल करावे लागले. बिश्नोईची प्रकृती बिघडली होती असे सांगण्यात आले. बिश्नोई हे 4 जुलैपासून धार्मिक कारणास्तव उपवास करत होता असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. गँगस्टर बिश्नोईला तुरुंगातून रुग्णालयात नेताना मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच्यावर विशेष कक्षात डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.
लॉरेन्स हा मागील अनेक दिवसांपासून आजारी होता. औषधांचे सेवन केल्यावरही त्याच्या प्रकृतीत फरक पडला नव्हता. लॉरेन्सला कावीळ झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स हा आरोपी आहे. लॉरेन्सच्या टोळीतील सदस्याने अलिकडेच अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करावी लागली आहे. लॉरेन्स बिश्नोईची टोळी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि झारखंडमध्येही सक्रीय आहे.









