चंदीगड : प्रतिनिधी
पंजाब पोलीस आणि NIAचा वॉन्टेड गँगस्टर सुखा दुनेकेच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांनी स्वीकारली आहे. सुखा दुणेके याची कॅनडाच्या विनिपेगमध्ये गँगवारमध्ये हत्या झाली होती.
सुखदूल सिंग उर्फ दुनेके हा कॅनडातील खलिस्तान चळवळीचा कार्यकर्ता तसेच बंबिहा या गँगस्टर टोळीचा भाग असल्याचे मानले जात होते. पंजाब पोलिसांना खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि खुनाच्या गुन्ह्यांप्रकरणी हवा होता.
एका पोस्टमध्ये बिश्नोई यांनी लिहिले आहे की, “सुखदूलने आमचा भाऊ गुरलाल ब्रारचा खून केला होता आणि विकी मिट्टुखेरा तसेच कबड्डीपटू संदीप नागल अंबियन यांच्या हत्येमागेही त्याचा हात होता.” असा खुलासा लॉरेन्सने दिला आहे.
त्याचप्रमाणे, दुसर्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने आणखी एक पंजाबमधील गँगस्टर एकेकाळचा बिश्नोईचा जवळचा सहकारी भगवानपुरिया यानाही अंबियनच्या हत्येचा बदला घेतल्याचे सांगून हत्येची जबाबदारी स्वीकारली. पंजाबमधील देविंदर बंबीहा गँगचा सहकारी दुणेके 2017 मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारावर कॅनडाला पळून गेला होता.