वृत्तसंस्था /टोरंटो
कॅनडात पंजाबचा गँगस्टर करनवीर सिंहची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कोकुइटलम शहरात हत्येचा हा प्रकार घडला आहे. करनवीर सिंहवर अनेक गुन्हे नोंद होते. करनवीर सिंह कारमधून उतरताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. करनवीर सिंहच्या कारचालकाची हत्या पोलीस चौकशी करत आहेत. ही हत्या अमली पदार्थांचे तस्कर किंवा गँगस्टर्सकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. डिसेंबर महिन्यात कॅनडाच्या सरी शहर पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील लोकांची यादी जारी केली होती. यात करनवीर गरचाचे नाव देखील सामील होते. गरचा हा गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांच्या संपर्कात होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. गरचाच्या हत्येपूर्वी मे महिन्यात व्हँकुव्हरमध्ये गँगस्टर अमरप्रीत समराची हत्या करण्यात आली होती. कॅनडा पोलिसांनी यामागे टोळीयुद्ध असल्याचा संशय व्यक्त केला होता.









