हिमाच्छादित पर्वत शिखरापर्यंत सहसा कोणीच जात नसल्याने गंगोत्री, बद्रीनाथ या ठिकाणी जाणाऱयांची संख्यादेखील फारच कमी. थंडीत बर्फामुळे तर उन्हाळय़ात बर्फ वितळल्यामुळे चालणं, पुढे जाणं शक्मय होत नाही. पण हीच गंगोत्री बारा मुखांनी वाहायला लागल्यामुळे तिचा अलकनंदा हा प्रवाह, ऋषीगंगेशी ज्या ठिकाणी मिळतो ती जागा, साक्षात विष्णुंनीसुद्धा तप-साधनेसाठी निवडावी हे विशेष.
हिमालयाचं इथलं रूप म्हणजे भगवंताचे विराट रूपच. शुभ्र धवल गिरी शिखरे, नीलवर्ण आकाशात फेरफटका मारायला निघाली असावी असे वाटते. याच शिखरावर विसावलेली सुर्यकिरणे सगळय़ांना गोंजारत पुढे सृष्टीत ऐसपैस पाय सोडून रेंगाळतायत असेही वाटते. इथल्या वातावरणातील भावगंभीरता भगवान विष्णुंनादेखील निस्तब्ध करून गेली तर तुमच्या आमच्या सामान्य माणसाचे काय? इथे सृष्टी अनंताच्या ध्यानात समाधिस्थ झालीये अशी प्रचिती येते. समाधिस्थ माणूस निःशब्द असतोच म्हणून ही शांतता. या सगळय़ा विशाल अनंताचे महीमान गायला उभ्या ठाकलेल्या हिमालयाचे शुभ्र, ज्योतिर्मय रूप बघता बघता मनही एका लयीत, सुरात, नादात वेडाऊन गायला लागते ‘जय बद्रीनाथ, विष्णवे नमः’ भागवताची सुरवातच ज्या बद्रीनाथाच्या सान्निध्यात झाली त्याचे वर्णन वाचले की परत परत मनात येते की लगेच जाऊन त्या संगमावर काही ऐकायला येतेय का बघावे. शांत ध्यानधारणा करावी आणि हे सगळेच पुनः पुन्हा अनुभवावे. एखादे तरी ऋषीमुनी आपल्याला आशीर्वाद द्यायला येतील. सप्तषी, शुक्रवार, शौनक, सुत सगळेच विद्वतजन या बद्रीनाथाच्या सान्निध्यात असताना श्री.नारदमुनी पृथ्वीवरील कलीयुगाचे भयंकर वर्णन करत होते. अनेक देवळात, तीर्थक्षेत्रात जाऊन आले तरी त्यांना मनःशांती मिळाली नव्हती. कारण दिखाऊ वृत्तीचा मनुष्य प्राणी भक्ती आणि वैराग्यापासून केव्हाच दूर झाला होता. भौतिक सुखाच्या जगात देशाभिमान जपतांना अध्यात्म मार्ग हरवून बसला होता. त्यावरचा उपाय शोधत नारद मुनी या गंगा अलकनंदेच्या संगमावर आले. तपश्चर्या केली आणि मगच भागवत कथेचा लाभ झाला. अनेक ऋषीमुनी आपल्या प्रखर तेजाने प्रकटले आणि भागवत भक्तीच्या या संगमावर भक्ती आणि वैराग्याचे प्रवाह एकत्रीत वाहायला लागले. 1) भगवान श्री बद्रीनाथजी तपश्चर्येला आल्यानंतर इथेच वास्तव्याला थांबले. याची प्रचिती अनेकांना वेगवेगळय़ा रूपात दर्शन झाल्यानंतर आजही येतेच. म्हणून हे स्थान मोठे. विश्वाच्या प्रकटीकरणाला इथूनच सुरूवात झाली. 2) पहिल्या कौमार सर्गात अत्यंत कठीण ब्रह्मचर्य पालन करणारे सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या चार ब्राह्मणरूपात विष्णुचे दर्शन झाले. 3) नंतर रसातळाला गेलेली पृथ्वी वाचवण्यासाठी वराह अवतार 4) ऋषीसर्गात देवषी नारदांचा जन्म कर्म बंधनातून मुक्ती मिळवता येते हे सांगण्यासाठी झाला. 5) धर्मपत्नी मूर्तीपासून नर व नारायण यांच्या रूपात अवतार घेऊन धर्म प्रसार व मन इंद्रियांवर संयम व ऊग्र तपश्चर्या सांगितली. 6) पाचवा अवतार सिद्धांचे स्वामी.








